दीप्ती तुझं खूप खूप स्वागत


आज दीप्ती च्या काय भावना आहेत आणि तिची काय मनास्तिथी आहे हे मला माहित नाही. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे " You can choose your friends but you cannot choose your relatives " म्हणजे तुम्ही तुमचे मित्र निवडू शकतात पण तुम्ही तुमचे नातेवाईक निवडू शकत नाही. तर का ? कारण नातेवाईक रक्ताचा गाठींनी जोडलेले असतात तर मित्र तुम्ही ठरवू शकतात की मला या व्यक्तीचा स्वभाव आवडतो. पण मी स्वतःला भाग्यवान समजेल की मला इतके चांगले नातेवाईक मिळाले की ते माझे मित्रच आहेत.
मी आत्ता ऐकलं की आज नवीन नात्याची सुरवात झाली कारण आज हे नातं जोडल्या गेलं आहे, किंवा हे बंधन बांधल्या गेलं आहे. पण मी ह्याला बंधन म्हणणार नाही किंवा जोड म्हणणार नाही कारण बंधन म्हणजे साखळ दंडाने बांधल्या सारखं होतं, नाहीतर जोड म्हणजे कितीही चांगलं ग्लू वापरलं तरी ती जोडलेली भेग ही दिसतेच. म्हणून मी या नात्याला जोड म्हणणार नाही किंवा बंधन हि म्हणणार नाही, तर मी म्हणेल की हे नातं विणल्या गेलं आहे जिथे दोन धागे स्वेछेने सोबत येउन एक वस्त्र तयार करण्यासाठी प्रयन्त करतात.
मी सगळ्यांचा अभिनंदन करतो की आज आपल्या सगळ्यांच्या नाट्य मध्ये दीप्तीचा नातं पण विणल्या गेलं आहे. सगळ्यांचा अजून अभिनंदन करतो की त्यांनी जी आत्मीयता दाखवली हूर हूर दाखवली हे सगळ्या कार्य पार पाडण्यांत - ते खूप सुंदर होतं. सगळे आपल्या सोबत होते माझं आजोळ , माझ्या वडलांच आजोळ सगळ्यांचं अभिनंदन
दीप्ती तुझा खूप खूप स्वागत .... :)
- कल्पक पिंगळे


बाबांनी दीप्तीच केलेलं स्वागत -
नौकरी लागली लग्न झाले. शिल्पा सारखी गृहकृत्य दक्ष पत्नी मिळाली. शीतल - कल्पक ने संसाराची चौकट पूर्ण केली. कल्पक संगे तुझी (दीप्ती) आणी शीतल संगे अमोघ च्या आगमनाने कृतार्थता लाभली. सिद्धार्थ आणी साराने आनंदाचा कळस चढवला. सर्व आप्तांच्या प्रेमाने जीव भारावून गेला. आई वडील सासू सासरे यांचं खूप प्रेम मिळालं. त्यांच्याच आशीर्वादानं समोर आलेलं प्रत्येक आव्हान स्वीकारलं.
आता एकच विनवणी ईश्वर चरणी - सुख, समाधान, आरोग्य सर्वांना लाभावे, महाराजांच्या चरणी सदैव नतमस्तक राहावे .
- श्याम पिंगळे


आईनी दीप्तीच केलेलं स्वागत -
चि. सौ. दीप्ती,
मंगल दिन मंगल प्रभात
सूर्याची पसरली लाली
अशा या मंगल क्षणी
दीप्तीच्या रूपाने लक्ष्मी घर आली

प्रिय सौ. दीप्ती -
मागील कित्येक दिवस ज्या आतुरतेने आम्ही तुझ्या आगमनाची वाट बघत होतो तो हा आनंदाचा क्षण.हा क्षण तुझ्यासाठी एका डोळ्यात आसू आणी एका डोळ्यात हसू आणणारा . माहेरचे पाश सोडून येताना तू थोडी बावरलीस याची कल्पना आहे पण आपल्या ह्या नवीन घरातली नातीही अत्यंत आनंदाने तुझी वाट बघतात आहेत. तेव्हा दीप्ती तुझ्या समोर आलेलं हे नवीन आयुष्य, नवीन संसार
१) ही एक पूजा समाज आणी ती भक्तिभावाने कर.
२) संसार हा एका चित्रकाराचा पट आहे, ह्यातील प्रत्येक रंग जाणून घे आणी त्यांच्याशी एकरूप हो.
३) हा एक रंगमंच आहे. यावर येणाऱ्या प्रत्येक पात्राची तू ओळख करून घे.
४) संसाराच्या ह्या संगीतात विसंवादी सूर लागू देऊ नकोस, तर तुझ्या सुमधुर स्वरांनी तो सुरेल होऊ दे.

ह्या सगळ्यात तू कुठे चुकलीस, घाबरलीस तर तुला सावरायला मी आहे. सासू असले तरी आईच्या मायेची उब देईन . बाबांमध्ये तुला तुझे बाबाच दिसतील. तर शीतलच्या सहवासात तुला तुझ्या मोठ्या बहिणीचं प्रेम मिळेल-
आणी हो मुख्य माणूस तर राहिलंच.
कल्पक ला उत्तम शिक्षण आणी संस्काराचं लेणं दिलं. आता इथून पुढे त्याला यशस्वी होण्यासाठी तुझ्या साथीची गरज आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे तू जाणतेस. तेव्हा तुझ्या वैवाहिक जीवनासाठी तुला शुभेछा देते आणी या सगळ्यातून "सौ. दीप्ती पिंगळे" हे तुझं स्वतंत्र, सुंदर व्यक्तिमत्व आकाराला येऊ दे असा आशीर्वाद देते.
- सौ शिल्पा पिंगळे

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment